COMPANY HISTORY - Misal Darbar

मिसळ दरबार…

मिसळ हे खर्या अर्थाने महाराष्ट्राचे व्यंजन आहे. मुंबईकर असो, पुणेकर असो वा कोल्पापुरकर पण मिसळ म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. महाराष्ट्राची ही मिसळ देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्याच्या उद्देशाने मी २७ जुलै २०१६ रोजी ’मिसळ दरबार’ची स्थापना केली.
मी मूळचा जळगावचा. सध्या पुण्यात राहतो. दहावीपर्यंत शिक्षण आणि आय. टी. आय. (फिटर) करून टेल्कोमध्ये काही काळ नोकरी केली. एक दिवस नोकरीवरून घरी येताना मनाशी दृढ निश्चय केला की आता नोकरी करायची नाही. व्यवसाय करायचा. मग तो कोणताही असोत.
२००६ साली मी एक छोटंसं दुकान भाड्यावर  घेतलं व तिथे ’साई कॅफे कट्टा’ नावाने कॉफी शॉप सुरू केलं. माझी कॉफीची चव ग्राहकांना खूप आवडू लागली. मग ग्राहकच फ्रेचाईजी मागू लागले. गेल्या वर्षी मी कॉफी शॉपची फ्रेचाईजी द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत मी ??? कॉफी शॉपची फ्रेचाईजी दिल्या आहेत.

मिसळ हे खर्या अर्थाने महाराष्ट्राचे व्यंजन आहे. मुंबईकर असो, पुणेकर असो वा कोल्पापुरकर पण मिसळ म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. 

 महाराष्ट्राची ही मिसळ देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्याच्या उद्देशाने मी २७ जुलै २०१६ रोजी ’मिसळ दरबार’ची स्थापना केली.
मी मूळचा जळगावचा. सध्या पुण्यात राहतो. दहावीपर्यंत शिक्षण आणि आय. टी. आय. (फिटर) करून टेल्कोमध्ये काही काळ नोकरी केली. एक दिवस नोकरीवरून घरी येताना मनाशी दृढ निश्चय केला की आता नोकरी करायची नाही. व्यवसाय करायचा. मग तो कोणताही असोत.
२००६ साली मी एक छोटंसं दुकान भाड्यावर  घेतलं व तिथे ’साई कॅफे कट्टा’ नावाने कॉफी शॉप सुरू केलं. माझी कॉफीची चव ग्राहकांना खूप आवडू लागली. मग ग्राहकच फ्रेचाईजी मागू लागले. गेल्या वर्षी मी कॉफी शॉपची फ्रेचाईजी द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत मी ??? कॉफी शॉपची फ्रेचाईजी दिल्या आहेत.

FAVORITE FAST FOOD IN MAHARASHTRA

How it all came to be…

कॉफी शॉपच्या या यशस्वी अनुभवावरून मोठं पाऊल उचलायचं ठरवलं. कॉफी शॉपप्रमाणेच रेडी-टू-सर्व्ह अशा मिसळची निर्मिती केली. मिसळ दरबारच्या विविध फ्रेचाईजी देऊन एकच चव असलेली मिसळ संपूर्ण देशभरात मिळेल असा प्रयत्न आहे. मिसळ दरबारची पहिली गुजरात राज्यात अहमदाबाद येथे सुरू झाली आहे.
टेक्नॉलॉजीच विचाराल तर मिसळ ही कमीत कमी बारा महिने खराब होत नाही. फ्रेचाईजी शॉपमध्ये रेडी-टू-सर्व्ह असलेली आमची मिसळ फक्त गरम करून ग्राहकाला खायला देता येण्यासारखी आहे. याच्या निर्मितीत कोणत्याही प्रकारचे रंग वा प्रिझर्वेटीव्हस मिसळलेले नाहीत.
माझं स्वप्न आहे की भविष्यात संपूर्ण भारतात कमीत कमी माझ्या शंभर फ्रेचाईजीस असाव्यात व २०२२ सालच्या जानेवारीत अमेरिकेत माझं स्वत:चं मिसळ दरबार असावं.